Wednesday, December 25, 2013

Thursday, December 5, 2013

‘खावाकी रेसिपी स्पर्धे’चा बक्षिस वितरण समारंभ


    पुणेकर गृहिणींच्या पाककौशल्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘खावाकी फूड प्रॉडक्ट्स’तर्फे ‘खास रेसिपी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोथरुड, सिंहगड रोड, सदाशिव पेठ, सातारा रोड, वारजे, अशा विविध भागांतून शंभरहून अधिक गृहिणींनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. व्हेज व नॉन-व्हेज अशा दोन प्रकारच्या रेसिपी यामध्ये स्वीकारण्यात आल्या. गेली २७ वर्षे चकली, चिवडा, व फरसाण पदार्थांच्या उत्पादन व विक्रीत अग्रेसर असलेल्या ‘गुप्ते फूड्स’चे संस्थापक श्री. एस. एम. गुप्ते यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. पदार्थ बनविण्याची पद्धत, आवश्यक सामग्रीची उपलब्धता व खर्च, बनविण्यास लागणारा वेळ, तसेच रेसिपीमधील नाविन्य, इत्यादी बाबी लक्षात घेऊन गुण देण्यात आले. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच ‘खावाकी’च्या कोथरुड शाखेमध्ये पार पडला. यावेळी विजेत्यांची नावे घोषित करून परीक्षक एस. एम. गुप्ते यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. ‘खावाकी’च्या संचालिका शर्मिष्ठा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे -
१. खास रेसिपी विजेते क्र.१ (व्हेज) - रोख रु.२,०००/-
    मनिषा माधव भावे (गावरान हुरडा लॉलीपॉप)
२. खास रेसिपी विजेते क्र.१ (नॉन-व्हेज) - रोख रु.२,०००/-
    शोभा श्रीकांत उरुणकर (खेकड्याचा रस्सा)
३. खास रेसिपी उत्तेजनार्थ (नॉन-व्हेज) - रोख रु.५००/-
    लीना इनामदार (जलपरी कटलेट)
४. खास रेसिपी उत्तेजनार्थ (व्हेज) - रोख रु.५००/-
    फरजाना नदाफ (क्रंची पॅटीस)
५. खास नावासाठी विशेष बक्षिस - रोख रु.५००/-
    उज्ज्वला पाटील (चिकन मेमसाब)

    बक्षिस विजेत्यांचे व स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी स्पर्धकांचे आप्त व ‘खावाकी’चे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बक्षिस वितरणानंतर विजेत्यांनी व स्पर्धकांनी स्पर्धेचे आयोजन व निकाल यांबाबत समाधान व्यक्त करून, यानिमित्ताने आपल्या पाककलेला कौतुक मिळवून दिल्याबद्दल ‘खावाकी’चे आभार मानले. भविष्यात अशा आणखी स्पर्धा भरवून इतर गृहिणींनाही आपले पाककौशल्य दाखविण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा काही स्पर्धकांनी व त्यांच्या सोबत आलेल्या मित्रमंडळींनी व्यक्त केली. ‘पूना शाही मसाले’ यांच्या सौजन्याने सर्व उपस्थितांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.