Monday, October 6, 2014

पाककृतीः रवा लाडू

साहित्यः
रवा - अडीच मोठे फुलपात्र (५०० ग्रॅम)
नारळाचा चव - अर्धं मोठं फुलपात्र (१०० ग्रॅम)
साखर - दोन मोठे फुलपात्र (४०० ग्रॅम)
साजूक तूप - चार टेबल स्पून (८० ग्रॅम)
वेलची पावडर - चवीनुसार
बेदाणे

कृतीः
रवा गुलाबीसर भाजुन घ्यायचा. रवा भाजताना त्यात थोडं-थोडं साजूक तूप मिसळायचं. रव्याला गुलाबी रंग आल्यावर त्यात नारळाचा चव घालून अजून थोडा वेळ खमंग भाजायचं.
आता पाक तयार करायचा. साखर एका पातेल्यात घेऊन त्यात साखर भिजेल एवढं तूप मिसळायचं. एक उकळी आल्यावर साखर विरघळल्याची खात्री करून गॅस बंद करायचा. तयार झालेला साखरेचा पाक भाजलेल्या रव्यामध्ये गाळून मिसळायचा. चवीसाठी वेलची पावडर घालून हे मिश्रण ३ ते ४ तास मुरू द्यायचं.
लाडू वळताना बेदाणे मिक्स करून वळल्यास लाडू आकर्षक दिसतात.
लाडू वळताना मिश्रण कोरडं वाटल्यास दुधाचा हात लाऊन लाडू वळायचे.

No comments:

Post a Comment