Wednesday, March 20, 2013

खावाकी... पुन्हा घरपोच!

"हॅलो, खावाकी?"
"हो, बोला. काय ऑर्डर करायचंय आपल्याला?"
"मी व्ही. व्ही. देशपांडे बोलतोय पाषाणमधून. मागे मी तुमच्याकडून पुरणाच्या पोळ्या आणि उकडीचे मोदक घेतले होते. मला १५ तारखेला २० पुरणपोळ्या आणि १ किलो चकली हवीय."
"२० पुरणपोळ्या आणि १ किलो चकली, १५ तारखेला. मिळेल, पण सध्या आमची होम डिलीव्हरी सेवा चालू नाही. तुम्हाला लक्ष्मी रोड किंवा स्वारगेटच्या पिक-अप सेंटरवरून घेऊन जावं लागेल."
"अहो पण गेल्या वेळेस तर तुम्ही मला पाषाणला डिलीव्हरी दिली होती. प्लीज मला १५ तारखेलाही होम डिलीव्हरी द्याल का?"
"माफ करा, पण सध्या आम्ही त्या भागात डिलीव्हरी देऊ शकत नाही."
"अहो, मी सिनिअर सिटीझन आहे हो. ती तुमची होम डिलीव्हरीची सोय इतकी चांगली आहे ना आमच्यासाठी... फक्त फोनवरून ऑर्डर दिली की घरपोच! का बंद करताय ही सर्व्हीस?"
"बंद करत नाही, पण सध्या आम्हाला शक्य होत नाहीये. तरी लवकरच होम डिलीव्हरी पुन्हा सुरू होईल. तेव्हा तुम्हाला कळवूच."
"ठीक आहे. १५ तारखेला मी लक्ष्मी रोडवरून पिक-अप करेन. पण तेवढं होम डिलीव्हरीचं लवकर सुरू करा प्लीज..."
---------------------------------

"हॅलो, खावाकी फूड प्रॉडक्ट्स का?"
"हो बरोबर. बोला काय ऑर्डर आहे आपली?"
"मी मिसेस साठे बोलतीये कोथरूडमधून. मला पुढच्या सोमवारी १५ खव्याच्या पोळ्या, अर्धा किलो बेसन लाडू, आणि अर्धा किलो चकली हवीय."
"मिळेल, पण सध्या आम्ही होम डिलीव्हरी देऊ शकत नाही. तुम्हाला आमच्या लक्ष्मी रोड किंवा स्वारगेटच्या पिक-अप सेंटरवर यावं लागेल."
"अहो पण मागच्या वेळी तर तुम्ही डिलीव्हरी दिली होती ना... इतकं बरं पडतं म्हणून सांगू... एकदा फोन करून तुमच्याकडं ऑर्डर दिली की निश्चिंतपणे बाकीच्या कामाला लागता येतं. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी सगळे पदार्थ घरपोच! आता सोमवारी आमच्याकडं छोटा कार्यक्रम आहे. 'खावाकी'ला ऑर्डर देऊन टाकू आणि मग बाकीच्या तयारीला लागू असा प्लॅन होता बघा माझा..."
"माफ करा, पण सध्या होम डिलीव्हरी शक्य नाही. लवकरच आम्ही पुन्हा ही सोय सुरू करू, तेव्हा तुम्हाला कळवूच..."
---------------------------------

...सिनिअर सिटीझन देशपांडे आणि हाऊसवाईफ मिसेस साठे... अशा अनेक कस्टमर्सनी आवर्जून 'खावाकी'च्या होम डिलीव्हरीचं कौतुक केलंय आणि ही सेवा पुन्हा सुरू करावी म्हणून आग्रह धरलाय... थोड्याच काळात पुणेकरांचे फेवरीट बनलेले 'खावाकी'चे फेस्टीवल फूड आयटम्स आता पुन्हा मिळणार घरपोच! सण असो किंवा घरगुती समारंभ, वाढदिवस असो किंवा ऑफिसची पार्टी, पाहुण्यांना बोलवा, मित्रांसोबत शेअर
करा, किंवा स्वतःसाठी ऑर्डर करा... 'खावाकी'चे खास - पुरणपोळी, खवापोळी, उकडीचे मोदक, सीकेपी खासियत खाजाचे कानवले, आणि इतर अनेक पदार्थ... पुन्हा एकदा 'फ्री होम डिलीव्हरी'सहीत. आजच ऑर्डर करा - 9552580321 किंवा www.khawakee.com वर.