Saturday, January 28, 2023

Watch What You Eat…

Food is an essential part of our lives and our choice of food can have a significant impact on our health and well-being. It is important to pay attention to what we eat and how it affects our bodies. Our food tells us whether it is good for us or not, and we can make better choices by checking if it is too spicy, oily, or sweet. Additionally, we should also check if it smells good and is hygienic.

One of the most obvious indicators of whether a food is good for us or not is its smell. If the food smells bad or rancid, it is likely not safe to eat. Similarly, if the food looks or appears spoiled, it should be avoided. Additionally, we should also check for hygiene standards when choosing food, especially when buying from street vendors or small local shops.

Another important factor to consider when choosing food is its level of spiciness, oiliness, and sweetness. Consuming too much spicy, oily, or sweet food can have negative effects on our health. Excessive spicy food can cause acidity and heartburn, while oily food can lead to weight gain and high cholesterol. Moreover, consuming too much sweet food can lead to diabetes and other health issues.

One of the reasons why we consume food that we know is not good for us is the influence of advertising and marketing. Many food companies invest heavily in advertising and marketing campaigns to make their products more appealing to consumers. They use catchy slogans, colorful packaging, and celebrity endorsements to make their products seem more desirable. As a result, we are often tempted to buy and consume food that we know is not good for us.

Another reason why we consume food that we know is not good for us is the influence of our social environment. We often eat what our friends and family eat and follow their food choices. When we are around people who eat unhealthy foods, we are more likely to follow their lead and make the same choices.

In conclusion, it is important to pay attention to our food choices and how they affect our health. Our food tells us whether it is good for us or not, and we can make better choices by checking if it is too spicy, oily, or sweet. Additionally, we should also check if it smells good and is hygienic. However, the influence of advertising and social environment also play a role in our food choices. We should be mindful of these factors and make informed decisions when it comes to food. Ultimately, it is important to make conscious and healthy food choices to maintain a good health and well-being.

Sharmishtha Gupte-Shinde
Founder Director, Khawakee Foods Pvt. Ltd.

अन्न हा आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे आणि आपण काय खातो याचा आपल्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण काय खातो आणि त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्यासमोर येणारे अन्नपदार्थच आपल्याला सांगतात की ते आपल्यासाठी चांगले आहेत की नाहीत. आणि ते खूप मसालेदार, खूप तेलकट किंवा खूप गोड आहेत की नाहीत हे तपासून आपण त्यापैकी चांगले पर्याय निवडू शकतो. याशिवाय, पदार्थांचा वास चांगला आहे का आणि ते स्वच्छ आहेत का हे देखील आपण तपासले पाहिजे.

एखादा पदार्थ आपल्यासाठी चांगला आहे की नाही हे ओळखण्याच्या सर्वात स्पष्ट गोष्टींपैकी एक म्हणजे त्याचा वास. जर अन्नाला दुर्गंधी किंवा उग्र वास येत असेल तर ते खाणे सुरक्षित नसते. तसेच अन्न खराब झालेले दिसल्यास किंवा खराब झाल्याचे वाटत असल्यास ते नक्कीच टाळावे. याव्यतिरिक्त, खाद्यपदार्थ निवडताना, विशेषत: रस्त्यावरील विक्रेत्यांकडून किंवा स्थानिक दुकानांमधून खरेदी करताना आपण स्वच्छतेचे काही स्टँडर्ड देखील तपासले पाहिजेत.

अन्नपदार्थ निवडताना विचारात घेण्याचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील मसालेदारपणा, तेलकटपणा आणि गोडवा. जास्त मसालेदार, जास्त तेलकट किंवा जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जास्त मसालेदार अन्नामुळे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते, तर तेलकट अन्नामुळे वजन वाढू शकते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. शिवाय, जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेह आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात, असे म्हटले जाते.

आपल्यासाठी चांगले नसलेले अन्नपदार्थ आपण सेवन का करतो याचे एक कारण म्हणजे जाहिरात आणि मार्केटींगचा प्रभाव. खाद्यपदार्थ बनवणाऱ्या अनेक कंपन्या आपले प्रॉडक्ट्स जास्तीत जास्त आकर्षक बनवण्यासाठी जाहिरात आणि मार्केटींग कॅम्पेन्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. आपले प्रॉडक्ट्स अधिक चांगले दिसण्यासाठी ते आकर्षक घोषणा, रंगीबेरंगी पॅकेजिंग आणि प्रसिद्ध सेलिब्रिटीजच्या जाहिरातींचा वापर करतात. परिणामी, आपल्यासाठी चांगले नाही हे आपल्याला माहीत असून देखील तेच अन्नपदार्थ विकत घेण्याचा आणि सेवन करण्याचा आपल्याला अनेकदा मोह होतो.

आपल्यासाठी चांगले नसलेले अन्नपदार्थ आपण सेवन का करतो याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या सामाजिक वातावरणाचा प्रभाव. आपले मित्र आणि कुटुंबिय जे खातात तेच अनेकदा आपण खातो आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी-निवडीचे पालन करतो. जेव्हा आपण आरोग्याला हानीकारक अन्नपदार्थ खाणाऱ्या लोकांच्या आजूबाजूला असतो, तेव्हा आपण त्यांच्या खाण्याच्या सवयींचे अनुसरण करण्याची आणि त्यांच्यासारखेच पदार्थ निवडण्याची अधिक शक्यता असते.

शेवटी, आपल्या आहाराकडे विचारपूर्वक लक्ष देणे आणि आपण खात असलेल्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो यावर लक्ष देणे महत्वाचे आहे. आपल्या समोर आलेले अन्नच आपल्यासाठी ते चांगले आहे की नाही हे आपल्याला सांगत असते आणि ते खूप मसालेदार, तेलकट किंवा गोड आहे की नाही हे तपासून आपण चांगल्या पदार्थांची निवड करू शकतो. शिवाय, पदार्थाचा वास चांगला आहे का आणि ते स्वच्छ आहे का हे देखील आपण तपासले पाहिजे. पण जाहिराती आणि सामाजिक वातावरणाचा प्रभाव देखील आपल्या खाद्यपदार्थांच्या निवडीमध्ये महत्त्वाचा ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे. आपण या घटकांकडे लक्ष देऊन माहितीपूर्ण निर्णय घेतले पाहिजेत. शेवटी, चांगले आरोग्य आणि स्वास्थ्य राखण्यासाठी जागरूक राहणे आणि आरोग्यपूर्ण अन्नपदार्थ निवडणे महत्वाचे आहे.

शर्मिष्ठा गुप्ते-शिंदे
संस्थापक संचालक, खावाकी फूड्स प्रा. लि.

Sunday, January 15, 2023

Happy Makar Sankrant


 गोड बोलायला निमित्त कशाला पाहिजे?

चवीचं खायचं तर 'खावाकी'च पाहिजे!

चवीचं खा आणि गोड-गोड बोला;
मकर संक्रांतीच्या मधुर शुभेच्छा...

#Khawakee #maharashtrian #restaurant #festival #food #foodblogger #pune #vegetarian #goolpoli #sankrant #marathi #kitchen #homedelivery #foodphotography #loveofeating

Tuesday, January 10, 2023

Bhogi Special Menu from Khawakee


 खास भोगीसाठी 'खावाकी'चा स्पेशल कॉम्बो -

भोगीची (मिक्स) भाजी + तीळ लावलेली बाजरीची भाकरी + मसाले भात + कांद्याची पात

स्विगी / झोमॅटो / व्हॉट्सॲपवर उपलब्ध... 95525 80321 

#Khawakee #maharashtrian #restaurant #festival #food #foodblogger #pune #vegetarian #bhakri #bhogi #sankrant #marathi #kitchen #homedelivery #foodphotography #loveofeating

Sunday, January 1, 2023

Happy New Year 2023




 #happynewyear2023 #khawakee #pune #loveofeating #maharashtrian #food