Sunday, January 26, 2025

Are Aggregators Helping or Hurting ? | Khawakee attends Townhall 10.0

नॅशनल रेस्टॉरन्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (एन.आर.ए.आय.) यांनी ‘टाऊन हॉल १०.०’ हा ऑनलाईन इव्हेंट आयोजित केला. एन.आर.ए.आय. ही भारतातल्या हॉटेल व्यावसायिकांची (रेस्टॉरन्ट्सची) संघटना आहे.

‘टाऊन हॉल १०.०’ या इव्हेंटमध्ये झोमॅटो, स्विगी, व इतर ॲग्रीगेटर्स, आणि त्यांच्या व्यवसायपद्धतींचा रेस्टॉरन्ट्स व इतर खाद्यपदार्थ व्यवसायांवर होणारा परिणाम, यावर चर्चा झाली.

सत्रात खालील मुद्दे मांडले गेले व त्यावर चर्चा झालीः

१. झोमॅटोने जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा ते पाच ते दहा टक्के कमिशनवर बिझनेस करत होते.
२. डायनिंगच्या बिझनेसला ऑनलाईन ऑर्डरची गरज असल्यामुळे त्यांनी ॲग्रिगेटर्सना मार्केटमध्ये एन्ट्री दिली.
३. जसा बिझनेस वाढत गेला तसा ॲग्रिगेटर्सने बिझनेसचा कंट्रोल घेतला आणि आता ते ३४ टक्क्यांपर्यंत कमिशन आकारत आहेत.
४. ॲग्रिगेटर्स कायम डिस्काउंटवरच बोलतात आणि त्या बाबतीत फार आग्रही असतात. त्यामुळे रेस्टॉरन्ट्सना दुहेरी तोटा सहन करावा लागतो.
५. ॲग्रिगेटर्स कुठल्याही प्रकारचा डेटा रेस्टॉरन्ट्स सोबत शेअर करत नाहीत.
६. ॲग्रिगेटर्सने प्रचंड डेटा होल्ड केलेला आहे, आणि त्या बेसिसवर ते स्वतःचे किचन्स अनैतिकपणे आणि गोपनीय पद्धतीने चालवत आहेत.
७. आता रेस्टॉरन्ट्सच्या स्वतःच्या कस्टमरला या प्लॅटफॉर्मची सवय लागली आहे, आणि हा ॲक्सेस आपणच दिला आहे असं बऱ्याच सिनियर मेंबर्सचं मत आहे.
८. डिलिव्हरी ऑर्डर्सचा बिझनेस स्टॅग्नेट झाल्यामुळे आता ॲग्रिगेटर्स डायनिंग बुकिंगच्या बिझनेसकडे वळले आहेत, आणि यामध्ये सुद्धा रेस्टॉरन्ट्सला ते मोठ्या प्रमाणात डिस्काउंट द्यायला लावत आहेत.
९. बिझनेसच्या, रिव्ह्यूजच्या, व ॲडव्हर्टायझिंगच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची ट्रान्सपरन्सी ॲग्रिगेटर्स ठेवत नाहीत.
१०. या प्लॅटफॉर्म्सवर खूप मोठ्या प्रमाणात इन्वेस्टमेंट केलेली असल्यामुळे ते कस्टमरला सहज डायव्हर्ट करू शकतात.
११. ॲग्रिगेटर्सचा बिझनेस आपल्यावर अवलंबून आहे, तरी ते आपल्याला डॉमिनेट करत आहेत, कारण आपण ते करू देतोय. डिलिव्हरी बिझनेसमध्ये आपण एकदा चूक केली आहे, आता डायनिंगमध्ये ती चूक परत करता कामा नये.
१२. झोमॅटो-स्विगीकडून येणारा बिझनेस मोठ्या प्रमाणात असला तरी तो रेस्टॉरन्ट्सला प्रॉफिटमध्ये नेऊ शकत नाही, कारण ते आकारात असलेले कमिशन, ऑर्डरसाठी द्यावा लागणारा डिस्काउंट, व प्लॅटफॉर्मवर करावी लागणारी जाहिरात, यामुळे रेस्टॉरन्ट्सना फक्त ऑर्डर्स मिळतात, पैसे मिळत नाहीत.
१३. स्विगी-झोमॅटो यांनी काही मोठ्या रेस्टॉरन्ट्सना बॅन केलं होतं. 

काही मेंबर सोल्युशन्सवर बोलले, जसे की, 

१. आपण ॲम्बियन्स, फूड क्वालिटी, हायजीन, व सर्व्हिस बेस्ट दिली पाहिजे, जेणेकरून आपले कस्टमर आपल्याकडे परत-परत येतील. झोमॅटो-स्विगी नव्हते तेव्हापासून आपण बिझनेस करतोय, त्यामुळे आपला बिझनेस त्यांच्याशिवाय चालू शकतो.
२. काही मेंबर्सचं म्हणणं होतं, की  एन.आर.ए.आय.ने स्वतःचा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म सुरू करावा.
३. कमिटीचं म्हणणं असं आहे की ओ.एन.डी.सी. प्लॅटफॉर्म गव्हर्मेंटचा असल्यामुळे आपण तो वापरण्यावर भर दिला पाहिजे, व हळूहळू तिकडे स्विच झालं पाहिजे. येथे कस्टमरला चांगले रेट व सर्व्हिस मिळाली, तर कस्टमर प्रायव्हेट ॲग्रिगेटर्सचे प्लॅटफॉर्म सोडून इकडे येऊ लागतील. या प्लॅटफॉर्मचे आपण मार्केटिंग करू शकतो.
४. ओ.एन.डी.सी.वर कसं लिस्टिंग करायचं, व ते कसं वापरायचं यासाठी NRAI पुढच्या महिन्यात एक सेमिनार आयोजित करेल.
५. गव्हर्मेंटच्या काही ऑफिसर्सबरोबर एन.आर.ए.आय.नी मीटिंग केलेल्या आहेत आणि पॉलिसी लेव्हलला यावर काम चालू आहे, पण ते इम्प्लिमेंट व्हायला काही वर्षं लागू शकतात.
६. काही मेंबरच्या म्हणण्याप्रमाणे आपण ठरवून स्विगी व झोमॅटोला बॉयकॉट केलं पाहिजे.

Tuesday, January 14, 2025

Khawakee Special Teel Gool Wadi



तीळ-गुळाची वडी, सोबत खोबरं जायफळ वेलची
वाढवा रोजच्या बोलण्यातली गोडी, अजून जराशी...

'खावाकी'ची तीळ गुळ वडी

ऑर्डरसाठी: 95525 80321

Friday, January 10, 2025

Khawakee Special Bhogi Combo



खास भोगीसाठी 'खावाकी'चा स्पेशल कॉम्बो -

भोगीची (मिक्स) भाजी + तीळ लावलेली बाजरीची भाकरी + मसाले भात + कांद्याची पात

व्हॉट्सॲप / कॉलः 095525 80321

Wednesday, January 1, 2025

Happy New Year 2025


Greetings from
Team Khawakee
for a Vibrant & Colourful,
Happy New Year 2025! 
🤩🎆🎇🥳

Enjoy eating! 😋