Thursday, September 5, 2013

‘खावाकी’ खास रेसिपी स्पर्धा

-: ‘खावाकी’ खास रेसिपी स्पर्धा :-

चवीचं खायला कुणाला आवडत नाही? आपल्याला सर्वांनाच आवडतं. पण चवीचं बनवायला प्रत्येकाला जमतंच असं नाही. म्हणून तर चवीचं बनवनार्यांना ‘सुगरण’ म्हणून मान मिळतो. अर्थात, सुगरण असण्यात पण प्रत्येकाची एक खासियत असते. अगदी चहा टाकण्यापासून पुरणपोळीचं जेवण घालण्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या पदार्थाची आपली एक खास रेसिपी तयार असते. ही रेसिपी कुणी आईकडून शिकतं, कुणी आजीकडून, कुणी सासूकडून, तर कुणी स्वतः प्रयोग करूनही बनवतं. तुमच्याकडेही आहे का अशी एखादी ‘खास’ रेसिपी? तुमचे कुटुंबीय, नातेवाईक, आणि मित्रमडंळी तर तुमच्या ‘खास’ रेसिपीवर खूष असतीलच; पण त्याहीपेक्षा मोठ्ठं कौतुक तुम्हाला मिळवून देण्यासाठी ‘खावाकी’ घेऊन येत आहे एक ‘खास रेसिपी स्पर्धा’! चला तर मग, आपली खास रेसिपी आम्हाला कळवा आणि आकर्षक बक्षीसांसोबत भरपूर कौतुक मिळवा.
  • स्पर्धेसाठी नोंदणी १ सप्टेंबर २०१३ पासून सुरू.
  • रेसिपी पाठवण्याची अंतिम तारीख - २८ सप्टेंबर २०१३.
  • नोंदणी अर्ज ‘खावाकी फूड प्रॉडक्ट्स’, शॉप नं.३, शिवरुद्र सोसायटी, आशिष गार्डन हॉल समोर, डी.पी. रोड, कोथरुड, पुणे-३८ येथे उपलब्ध.
  • www.khawakee.com या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीची सोय.
  • एका व्यक्तीकडून फक्त एक व्हेज व एक नॉन-व्हेज रेसिपी स्वीकारली जाईल.
  • स्पर्धेच्या निकालाबाबत परीक्षक व संयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
  • अधिक माहितीसाठी संपर्क - 9552580321

No comments:

Post a Comment