Saturday, October 4, 2014

पाककृतीः बेसन लाडू

साहित्यः   
बेसन - अडीच मोठे फुलपात्र (५०० ग्रॅम)
पिठी साखर - दोन मोठे फुलपात्र (४०० ग्रॅम)
साजूक तूप - दीड मोठे फुलपात्र (२५० ग्रॅम)
वेलची पावडर - चवीनुसार
काजू / बदामाचे काप

कृतीः
हरभरा डाळ खमंग भाजून जाडसर दळून घ्यायची.
एका कढईमधे बेसन (डाळीचं पीठ) भाजायला घ्यायचं. पीठ गरम झाल्यावर त्यात थोडं-थोडं तूप घालून खमंग लालसर रंग येईपर्यत भाजायचं. लाडवाला एकसारखा रंग येण्यासाठी पीठ बारीक गॅसवर भाजायचं.
मिश्रण कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर घालून मळायचं. मग त्यात चवीनुसार वेलची पावडर घालायची. मिश्रण चांगलं गार झाल्यावर त्याचे लाडू वळायचे.
आवडीनुसार काजू किंवा बदामाचे काप लावून सजवल्यास लाडू सुरेख दिसतात.

टीपः बेसन (डाळीचं पीठ) जाडसर असल्यास लाडू रवाळ लागतो आणि खाताना चिकट वाटत नाही.


No comments:

Post a Comment