Sunday, November 8, 2026

Diwali Wishes from Khawakee Foods


 

‘खावाकी’ची ही सतरावी दिवाळी.

पहिल्या दिवाळीत एक किंवा दोनच फराळाचे पदार्थ बनवले होते. यावेळी नऊ ते दहा पदार्थ होते. शिवाय पुरणपोळीपासून बिर्याणीपर्यंत जेवणाच्या ऑर्डरदेखील आहेतच.

फराळाचे पदार्थ एकावेळी किती बनवायचे याला मर्यादा आहेत, त्यामुळं दिवाळीच्या आठवडाभर आधी ऑर्डर घेणं थांबवायला लागतं. ज्यांना माहिती आहे ते कस्टमर महिनाभर आधीच ऑर्डर देऊन ठेवतात.

पंधरा वर्षांपासून दरवर्षी फराळ ऑर्डर करणारे कस्टमर आहेत. काहींच्या पुढच्या पिढ्या ऑर्डर करायला लागल्या आहेत. नव्याने ओळख झालेल्या कस्टमरच्या ऐनवेळी आलेल्या ऑर्डर घेता येत नाहीत, त्यामुळं काहीजण नाराज होतात; पण कितीही तयारी केली तरी सणासुदीला ऑर्डर आधीच थांबवायला लागतात हे खरं.

ऑर्डरची तयारी, वेळेत सगळ्या डिलीव्हरी, आणि मग किचनची सजावट. पुन्हा नवीन ऑर्डर, जुने-नवे कस्टमर, तोच विश्वास आणि नवीन उत्साह घेऊन ‘खावाकी’ पुन्हा तयार…

दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा!



#khawakee #loveofeating #maharashtrian #restaurant #festival #food #sweets #pune #homedelivery

No comments:

Post a Comment