Saturday, June 28, 2014

फराळाचे पदार्थ... वर्षभर!


खावाकीचे फराळाचे पदार्थ वर्षभर (ऑर्डरनुसार) उपलब्ध असतात.
जायफळ आणि वेलची घातलेली, गुळाच्या पुरणाची पोळी;
खव्याच्या सारणाची पोळी;
गूळ, बेसन, आणि तिळाच्या सारणाची पोळी;
गूळ-नारळाच्या सारणाचे, तांदळाच्या पातळ पारीचे, हातवळणीचे उकडीचे मोदक;
नारळाचा चव वापरुन साजूक तुपात बनवलेले रवा लाडू; आणि
सुक्या खोबर्‍याच्या सारणाची, साजूक तुपात तळलेली खाजाची करंजी...

आजच ऑर्डर करा - ९५५२५८०३२१ किंवा www.khawakee.com वर.

Friday, June 20, 2014

'ओन्ली टेक अवे' - महाराष्ट्र टाइम्स


महाराष्ट्र टाइम्स (पुणे टाइम्स, २० जून २०१४)

नोकरदार वर्गाला सोयीचं पडेल, म्हणून 'टेक अवे' या संकल्पनेतून 'खावाकी'चा टेक अवे जॉइंट कोथरुड इथं सुरु झाला. खास सीकेपी पद्धतीचे व्हेज आणि नॉन-व्हेज पदार्थ मिळण्याचं हे उत्तम ठिकाण. शाकाहारी पदार्थांमधे पुरणपोळी, उकडीचे मोदक, खाजाचे कानवले यासारखे पदार्थ आणि मांसाहारात चिकन करी, चिकन बिर्याणी, फिश फ्राय यासारख्या अस्सल सीकेपी पद्धतीच्या पदार्थांचा समावेश आहे. दीडशे रुपयांपासून डिश असल्यानं ग्राहकांनाही ते परवडतं. विशेष म्हणजे काही हॉटेलांमधे एकच प्रकारची ग्रेव्ही तयार ठेवली जाते आणि ऑर्डरप्रमाणे कॉम्बिनेशन बनवून दिले जाते. 'खावाकी'मधे मात्र मेन्यू आधीच ठरलेला असतो आणि त्याप्रमाणे मसाले तयार ठेवले जातात, असं 'खावाकी'च्या शर्मिष्ठा गुप्ते यांनी सांगितलं. आमच्या काही नियमित ग्राहकांची मोबाइलवर नोंदणी करून ठेवलेली आहे. मेन्यू ठरल्यानंतर तसा एसएमएसही त्यांना केला जातो. त्यावरून पार्सल घ्यायचं की नाही हा निर्णय ते घेऊ शकतात. वीकेन्डला तरुणाई आणि वीक डेजमधे ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद खूप असतो, असंही त्यांनी सांगितलं.


Thursday, June 5, 2014

वेगळी टेस्ट

खावाकीः नमस्कार, बोला काय देऊ?

कस्टमरः ते मागच्यावेळी दिलं होतं ना - चिकन ग्रेव्ही, तेच हवंय. पण मागच्यावेळी ग्रेव्ही जरा कमी पडली होती.

खावाकीः अच्छा, मग तुम्ही चिकन मसाला नेला असेल. त्यात थिक ग्रेव्ही येते. आज चिकन करी देऊ का? ती थोडी रस्सा-टाईप येईल.

कस्टमरः हो, चालेल. आणि टेस्ट एकदम मस्त आहे बरं का. म्हणजे आम्ही इथली चिकन ग्रेव्ही खाल्ल्यापासून बाहेर हॉटेलमधे चिकन ग्रेव्ही खाणं बंदच केलंय. तुमच्याकडं अगदी घरच्यासारखी टेस्ट वाटली.

खावाकीः थँक यू! ही ग्रेव्ही आम्हाला वेगळी बनवून नाही ठेवता येत. ती चिकनच्या पीसेसबरोबरच बनवली जाते. शिवाय ही ऑनियन-बेस ग्रेव्ही असते. त्यामुळं अगदी पातळ नाही होत.

कस्टमरः वा, मस्तच! खरं तर, आय वॉज सरप्राईज्ड. बाहेर खूप हॉटेल्समधे ग्रेव्हीची टेस्ट सेमच असते. मग चिकन खाल्लं काय, मटण खाल्लं काय, आणि पनीर खाल्लं काय... सगळं सारखंच लागतं.

खावाकीः आम्ही त्यामुळंच शक्यतो अ‍ॅडव्हान्स ऑर्डरप्रमाणंच बनवतो या डिशेस. या बनवून ठेवता येत नाहीत. आणि फार गडबडीत बनवताही येत नाहीत.

कस्टमरः बरोबर आहे. चांगलं खायचं म्हटलं की हे सगळं आलंच.

खावाकीः आता पुढच्या वेळी मटण करी ट्राय करा. म्हणजे तुम्हाला आणखी वेगळी टेस्ट मिळेल.

कस्टमरः हो हो, नक्की. आणि पुढच्या वेळी फोन करुन अ‍ॅडव्हान्स ऑर्डरच देईन.

खावाकीः थँक यू! एन्जॉय युवर फूड...