Friday, June 20, 2014

'ओन्ली टेक अवे' - महाराष्ट्र टाइम्स


महाराष्ट्र टाइम्स (पुणे टाइम्स, २० जून २०१४)

नोकरदार वर्गाला सोयीचं पडेल, म्हणून 'टेक अवे' या संकल्पनेतून 'खावाकी'चा टेक अवे जॉइंट कोथरुड इथं सुरु झाला. खास सीकेपी पद्धतीचे व्हेज आणि नॉन-व्हेज पदार्थ मिळण्याचं हे उत्तम ठिकाण. शाकाहारी पदार्थांमधे पुरणपोळी, उकडीचे मोदक, खाजाचे कानवले यासारखे पदार्थ आणि मांसाहारात चिकन करी, चिकन बिर्याणी, फिश फ्राय यासारख्या अस्सल सीकेपी पद्धतीच्या पदार्थांचा समावेश आहे. दीडशे रुपयांपासून डिश असल्यानं ग्राहकांनाही ते परवडतं. विशेष म्हणजे काही हॉटेलांमधे एकच प्रकारची ग्रेव्ही तयार ठेवली जाते आणि ऑर्डरप्रमाणे कॉम्बिनेशन बनवून दिले जाते. 'खावाकी'मधे मात्र मेन्यू आधीच ठरलेला असतो आणि त्याप्रमाणे मसाले तयार ठेवले जातात, असं 'खावाकी'च्या शर्मिष्ठा गुप्ते यांनी सांगितलं. आमच्या काही नियमित ग्राहकांची मोबाइलवर नोंदणी करून ठेवलेली आहे. मेन्यू ठरल्यानंतर तसा एसएमएसही त्यांना केला जातो. त्यावरून पार्सल घ्यायचं की नाही हा निर्णय ते घेऊ शकतात. वीकेन्डला तरुणाई आणि वीक डेजमधे ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद खूप असतो, असंही त्यांनी सांगितलं.


No comments:

Post a Comment