Thursday, June 5, 2014

वेगळी टेस्ट

खावाकीः नमस्कार, बोला काय देऊ?

कस्टमरः ते मागच्यावेळी दिलं होतं ना - चिकन ग्रेव्ही, तेच हवंय. पण मागच्यावेळी ग्रेव्ही जरा कमी पडली होती.

खावाकीः अच्छा, मग तुम्ही चिकन मसाला नेला असेल. त्यात थिक ग्रेव्ही येते. आज चिकन करी देऊ का? ती थोडी रस्सा-टाईप येईल.

कस्टमरः हो, चालेल. आणि टेस्ट एकदम मस्त आहे बरं का. म्हणजे आम्ही इथली चिकन ग्रेव्ही खाल्ल्यापासून बाहेर हॉटेलमधे चिकन ग्रेव्ही खाणं बंदच केलंय. तुमच्याकडं अगदी घरच्यासारखी टेस्ट वाटली.

खावाकीः थँक यू! ही ग्रेव्ही आम्हाला वेगळी बनवून नाही ठेवता येत. ती चिकनच्या पीसेसबरोबरच बनवली जाते. शिवाय ही ऑनियन-बेस ग्रेव्ही असते. त्यामुळं अगदी पातळ नाही होत.

कस्टमरः वा, मस्तच! खरं तर, आय वॉज सरप्राईज्ड. बाहेर खूप हॉटेल्समधे ग्रेव्हीची टेस्ट सेमच असते. मग चिकन खाल्लं काय, मटण खाल्लं काय, आणि पनीर खाल्लं काय... सगळं सारखंच लागतं.

खावाकीः आम्ही त्यामुळंच शक्यतो अ‍ॅडव्हान्स ऑर्डरप्रमाणंच बनवतो या डिशेस. या बनवून ठेवता येत नाहीत. आणि फार गडबडीत बनवताही येत नाहीत.

कस्टमरः बरोबर आहे. चांगलं खायचं म्हटलं की हे सगळं आलंच.

खावाकीः आता पुढच्या वेळी मटण करी ट्राय करा. म्हणजे तुम्हाला आणखी वेगळी टेस्ट मिळेल.

कस्टमरः हो हो, नक्की. आणि पुढच्या वेळी फोन करुन अ‍ॅडव्हान्स ऑर्डरच देईन.

खावाकीः थँक यू! एन्जॉय युवर फूड...

No comments:

Post a Comment