Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Tuesday, October 9, 2018

खावाकीचे रव्याचे लाडू


रवा घ्यावा भाजून साजुक तुपात, रंग व्हावा गुलाबी अन् खमंग त्याचा वास. ओल्या नारळाचा घालू चव खूप त्यात, मुरवायला साखरेचा हवा एकतारी पाक. वेलचीचा स्वाद कसा येई सुमधूर, बेदाण्याने नटवूया लाडू मऊसूत. मिळेल असा रव्याचा हा लाडू घरपोच, फोन लावा 'खावाकी'ला तुम्ही ताबडतोब !

साजुक तुपातले रवा लाडू, बेसन लाडू, भाजणीची चकली, नारळाची करंजी आणि इतर फराळाच्या पदार्थांसाठी -
'खावाकी' 9552580321

खमंग कुरकुरीत भाजणीची चकली


सर्व प्रकारच्या डाळी जीरे आणि धने, भाजणीसाठी योग्य प्रमाणात खमंग भाजून घेणे. उकड घ्यावी ऊनऊन, पीठ मळावं मन लावून, तळण्यासाठी ताव ठेवावा रंगाकडं लक्ष देऊन. खुसखुशीत चकलीला सुटतेच तेल, निथळून घ्यायला लागतोच वेळ. जुळून येते ही एक-एक गोष्ट, चकली होते तेव्हाच कुरकुरीत खमंग !!

खमंग कुरकुरीत भाजणीची चकली, पातळपोहा चिवडा, रवा लाडू, बेसन लाडू, नारळाची करंजी, खाजाची करंजी, आणि इतर फराळाच्या पदार्थांसाठी आजच कॉल / व्हॉट्सऐप कराः
'खावाकी' 9552580321

Wednesday, April 10, 2013

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!

काय ऑर्डर केलंत पाडव्यासाठी? खव्याच्या पोळ्या की खाजाचे कानवले?
पूर्ण पुण्यात फ्री होम डिलिव्हरी साठी 'खावाकी फूड प्रॉडक्ट्स'ला संपर्क करा.
फोनः ९५५२५८०३२१ वेबसाईटः www.khawakee.com


Monday, August 1, 2011

पहिली मंगळागौर, श्रावणातली...

मंगळागौर म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतला एक हळवा धागा.
श्रावणातल्या पहिल्या मंगळागौरीचं अप्रतिम वर्णन केलंय जगदीश खेबूडकरांनी. चित्रपट आहे 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी'. संगीत राम कदम यांचं, स्वर उषाताई व इतर. आणि पडद्यावर आहेत, संध्या आणि रंजना...

नाच गं घुमा, कशी मी नाचू ?

ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !

ह्या गावचा, त्या गावचा शिंपी न्हाई आला
चोळी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !

ह्या गावचा, त्या गावचा कासार न्हाई आला
बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !

फू बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी !
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट

बारा घरच्या बायका एक जागी मिळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !

लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !

घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया
नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
घुमु दे घागर घुमु दे !

पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, रात जागिवली पोरी पिंगा !

फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, झोप चाळिवली पोरी पिंगा !

शालू नेसल्याली भैन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मागं घालिवली पोरी पिंगा !

भाऊ माझा ग, तो ब राजा ग, अग जा जा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मला बोलिवली पोरी पिंगा !

तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, रूप हेकणं ग पोरी पिंगा
भैन माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !

भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा
भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा
अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !

भैन माझी ग जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, लुगडं नेशिवलं पोरी पिंगा !


(स्रोतः http://www.aathavanitli-gani.com/GenPages/Song.asp?Id=62144078684)

Sunday, October 17, 2010

विजयादशमीच्या शुभेच्छा !!

सोन्यासारख्या माणसांसाठी
सोन्यासारखा खाऊ ।
सोन्यासारखा खाऊ खाऊन
सोन्यासारखं राहू ॥

- 'खावाकी' कडून