Thursday, November 19, 2020

Let's Try Khawakee

🥣😋🍛🍗🍽️🧢

"आई, अहो तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही खाऊ शकता. मी फक्‍त एवढंच म्हटलं की मला नॉन-व्हेजचा वास सहन होत नाही. त्यामुळं मी नाही बनवू शकणार तुमच्यासाठी. पण हां, हॉटेलमधून आणायचं असेल तर सांगा, मी ऑफीसमधून येताना घेऊन येईन..."

"नको नको, मला नै बै ते हॉटेलातलं आवडत. केवढा मसालाच असतो त्यात. चिकनचे पिस तर शोधून काढायला लागतात..."

"...मग काय करायचं तुम्हीच सांगा आता."

"काय करणार सूनबाई, माझी म्हातारीची आता स्वैपाक बनवायची ताकद पण नाही. एके काळी पन्‍नास-पन्‍नास माणसांचा स्वैपाक घरातल्या घरात बनवायचे मी. आणि नॉन-व्हेज तर असं बनवायचे की लोक..."

"...माहित्येय मला आई ते सगळं. पण आपण आज काय करू शकतो यावर बोललो तर जास्त चांगलं, नाही का?"

"हं... राहू देत मग. असंच खावंसं वाटलं म्हणून म्हटलं तुला. नसेल जमत तर काय... आलीया भोगासी, असावे सादर..."

"असं नका म्हणू आई, मी बघते काहीतरी संध्याकाळपर्यंत. निघते आता, उशीर होतोय."

==========

"काय गं, काय शोधतीयेस 'गूगल'वर?"

"अगं काही नाही, 'चांगलं' नॉन-व्हेज बनवून देणारं कुणी मिळतंय का शोधत्येय..."

"काय म्हणतेस? तू आणि नॉन-व्हेज...?"

"माझ्यासाठी नाही गं... आईंसाठी. त्यांना आवडतं हे सगळं.. चिकन, मटण, फिश, आणि काय काय... मला तर वाससुद्धा सहन नाही होत त्याचा, मग घरात बनवणं तर लांबच!"

"अच्छा, मग हॉटेलमधून पार्सल मागवायचं ना त्यांच्यापुरतं..."

"मीपण तेच म्हणाले, पण त्यांना तसं मसालेदार नाही आवडत. आता त्यांना हवं तसं, घरगुती पद्धतीचं, चविष्ट, आणि 'चांगलं' नॉन-व्हेज बनवणारं शोधायचं तरी कुठं?"

"ए, तू 'खावाकी' ट्राय केलंयस का?"

"काय?"

"अगं 'खावाकी'... मागच्या महिन्यात रियाच्या बर्थडेला चिकन आणि व्हेज बिर्याणी नव्हती का मागवली डिनरसाठी?"

"हो हो हो, आठवलं. पण त्यांच्याकडं किलोवर ऑर्डर करायला लागत असेल ना? की प्लेट बेसिसवर पण नॉन-व्हेज मिळतं?"

"अर्थातच मिळतं! अगं आमच्याकडं तर सारखं चिकन बिर्याणी, चिकन करी, मेथी चिकन, बटर चिकन, आणि काय काय सारखं मागवत असतात."

"मागवत असतात म्हणजे? स्विगी-झोमॅटोवर आहे का 'खावाकी'?"

"हो, स्विगी-झोमॅटोवर तर आहेतच, पण तिथून नाही ऑर्डर करता आली तर व्हॉट्सऐपवर पण ऑर्डर देता येते. आपल्याला पाहिजे त्या एरियात होम डिलीव्हरी मिळते..."

"काय सांगत्येस काय? आणि पेमेंट कसं करायचं?"

"ऑनलाईन! जी-पे, युपीआय, बँक ट्रान्सफर, काहीही चालतं. बेस्ट नॉन-व्हेज फूड घरपोच मिळतं. छान घरगुती पद्धतीचं, कमी मसालेदार, चविष्ट, आणि गरम-गरम..."

"व्वा! तू सांगतियेस त्यावरून तरी आईंना आवडेल असंच वाटतंय. प्लीज मला नंबर देत्येस त्यांचा?"

"एक मिनिट हं... केला सेन्ड व्हॉट्सऐपवर. आणि हो, त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टा पोस्टसुद्धा बघून घे. काय मस्त-मस्त फोटो टाकतात डिशेसचे."

"थँक्यू व्हेरी मच! खूप मोठ्ठं काम केलंस तू माझं. आजच आईंसाठी चिकन करीची ऑर्डर देऊन टाकते..."

"ऑल द बेस्ट!"

🥣😋🍛🍗🍽️🧢

खावाकी 9552580321
#food #pune
#maharashtrian #restaurant 
#takeaway #homedelivery

No comments:

Post a Comment